चांगले नागरिक बनण्यावर भर द्या : नितीन नवीन
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी शुक्रवारी तऊणांना आवाहन केले की, एक चांगला अभियंता किंवा डॉक्टर बनण्यापेक्षा ‘चांगले नागरिक’ बनण्यावर लक्ष केंद्रीत करणे ‘अधिक महत्त्वाचे’ आहे. एखादी व्यक्ती चांगला अभियंता किंवा डॉक्टर होऊ शकते, पण एक चांगला नागरिक होणे अधिक महत्त्वाचे आहे, असे नवीन यांनी बिर्ला ऑडिटोरियममधील ‘युवा संवाद’ कार्यक्रमात म्हटले.
त्यांनी तऊणांना अपयशाची भीती न बाळगण्याचा आणि आयुष्यात शॉर्ट कट टाळण्याचा सल्लाही दिला. यामुळे ते योग्य ठिकाणी पोहोचतील, असे नवीन म्हणाले. जीवन अनमोल आहे. अपयश आले, तरी लगेच चुकीच्या मार्गावर जाऊ नये किंवा आपला जीव धोक्यात घालू नये. आपल्याला हे जीवन मिळाले आहे, आपण आपल्या आई-वडिलांसाठी आणि या भूमीसाठी काही तरी अर्थपूर्ण केले पाहिजे, असे भाजप अध्यक्ष पुढे म्हणाले.
Comments are closed.