IND vs AUS: एडिलेड वनडे जिंकण्यासाठी टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये करावे लागतील हे 3 बदल! जाणून घ्या सविस्तर

टीम इंडिया (Team india) पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून 7 सामने विकेट्सने पराभूत झाली. त्यामुळे आता मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला एडिलेड ओव्हलमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. दुसरा वनडे जिंकण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.

एडिलेड वनडेत कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Gautam Gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्लेइंग 11 मध्ये 3 बदल करणं आवश्यक आहे. जर असे बदल झाले नाहीत तर पुढच्या सामन्यात पुनरागमन करणं आणखी अवघड होईल.

पहिल्या वनडेत भारतीय संघाने ना फलंदाजीत चांगली कामगिरी केली, ना गोलंदाजीत. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, हर्षित राणाने (Harshit Rana) खूप निराशा केली. तो ना दडपण आणू शकला, ना विकेट घेऊ शकला आणि उलट भरपूर धावा देत राहिला. त्यामुळे इतर गोलंदाजांवरही दडपण वाढलं.

अशा परिस्थितीत हर्षितच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला (prasiddh krishna) संधी दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरनेही (Washington Sundar) अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलं नाही. त्याला एक विकेट मिळाली खरी, पण ऑस्ट्रेलियन फलंदाज त्याचा सहज सामना करत होते. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवची (Kuldeep yadav) पुनरागमनाची शक्यता आहे.

Comments are closed.