पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, सुनील गावस्कर यांनी निवडलेले हे 11 खेळाडू
आशिया कप 2024 यंदा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरुवात होईल, तर 10 सप्टेंबरपासून टीम इंडिया आपला मोहिमेचा प्रारंभ करेल. आशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध होणार असून हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. आता या सामन्यात भारताची अंतिम अकरा कशी असेल, हा मोठा प्रश्न आहे. याच पहिल्या सामन्यासाठी माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
शुबमन गिलच्या टी20 संघात निवडी नंतर आता मोठा प्रश्न असा आहे की भारताच्या अंतिम अकरामध्ये कोणते खेळाडू असतील आणि कोणते 11 जण निवडले जातील. याबाबत सुनील गावसकर यांनी यूएईविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
गावसकर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश केला आहे. मात्र, गावसकर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांना स्थान दिलेले नाही.
टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 19 सप्टेंबरला टीम इंडियाचा सामना ओमानविरुद्ध होईल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.
Comments are closed.