परकीय चलन साठा $ 1.18 अब्ज डॉलर्सने घसरला
मुंबई :
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 18 जुलैला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 695.49 अब्ज डॉलरवर घसरला होता. याच्या मागच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 696.67 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. 18 जुलैला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 1.18 अब्ज डॉलरची घसरण पाहायला मिळाली. सलगच्या दुसऱ्या आठवड्यात विदेशी चलन साठा घसरणीत राहिला असल्याची बाब समोर आली आहे. 18 जुलैला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्ता जिची हिस्सेदारी साठ्यामध्ये मोठी असते, ती देखील 1.201 डॉलरने घसरून 587.609 अब्ज डॉलर्सवर आली होती.
सुवर्ण साठ्यात वाढ
18 जुलैच्या आठवड्यात भारताच्या सुवर्ण साठ्यामध्ये 150 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. यायोगे देशाचा सुवर्ण साठा वाढत 84.499 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. सुवर्ण साठ्यामध्ये झालेली वाढ ही चलन साठ्याला स्थिरता देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते.
Comments are closed.