‘खोक्याभाऊ’च्या आलिशान ‘ग्लास हाऊस’वर वन विभागाचा बुलडोझर!

वन-विभाग-बुलडोजर-ऑन-खोक्या-भौ-लक्झरी-ग्लास-घर-सॅटिश-भोसले

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाऊच्या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या आलिशान ग्लास हाऊसवर वन विभागाने बुलडोझर चालवला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्याभाऊचे निरपराधांना बेदम मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत खोक्याभाऊवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच या खोक्याभाऊने एका वृत्तवाहिनीला महागड्या गाडीत बसून मुलाखत दिली. त्यानंतर तो गायब झाला आणि थेट प्रयागराजमध्ये त्याचे लोकेशन आढळले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने खोक्याभाऊच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, विमानतळावरून पलायन करण्याच्या बेतात असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले.

करण्यात पारंगत असलेल्या खोक्याभाऊवर राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई करण्यास धजावत नव्हते. परंतु पोलिसांनी धाडस केले आणि त्यानंतर वनविभागालाही हिंमत आली. खोक्याभाऊने बनवलेले आलिशान ग्लास हाऊस हे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधले आहे. मात्र दहशतीमुळे वन विभागाने याबद्दल चकार शब्द काढला नव्हता. पण खोक्याभाऊला ताब्यात घेताच वन विभागाने त्याच्या ग्लास हाऊसवर बुलडोझर चालवला.

शीशमहाल्च…

खोक्याभाऊचे घर हे समोरून कुडाचे दिसत असले तरी मागे शीशमहलच उभारण्यात आला होता. संपूर्ण घर काचेपासून बनवण्यात आले असल्याने त्याला ‘ग्लास हाऊस’ असे नाव पडले होते. वनविभागाने घरातील सर्व महागडे सामान अगोदर बाहेर काढले. अगोदर कंपाउंड वॉल तोडण्यात आली. त्यानंतर पाठीमागील बांधकामावर जेसीबी चालवण्यात आला. बुलडोझरच्या मदतीने ग्लास हाऊस नेस्तनाबूत करण्यात आले.

Comments are closed.