रुपयाचे स्वरूप
‘रुपया’ असा येईल…
? केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, सरकारी तिजोरीत येणाऱ्या प्रत्येक ऊपयात सर्वांत मोठा 66 पैशांचा वाटा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा राहील.
? प्रत्यक्ष कर सुमारे 39 पैशांचा वाटा उचलेल. यात प्राप्तीकराचा 22 पैसे, तर कॉर्पोरेट कराचा 17 पैसे इतका वाटा असेल. अप्रत्यक्ष करांमध्ये ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) प्रत्येक ऊपयात जास्तीत जास्त 18 पैशांचा वाटा उचलेल. याशिवाय उत्पादन शुल्कातून प्रत्येक ऊपयामागे 5 पैसे आणि सीमाशुल्क आकारणीतून 4 पैसे मिळतील असा अंदाज आहे.
? सुमारे 24 पैसे कर्ज आणि इतर दायित्वांमधून, 9 पैसे निर्गुंतवणुकीसारख्या करेतर महसुलातून आणि 1 पैसा बिगरकर्ज भांडवली ‘रिसीप्ट्स’मधून येईल.
व कर्ज व इतर दायित्वांमधून मिळणारे उत्पन्न प्रति ऊपया 24 पैसे असे असेल.
‘रुपया’ असा जाईल…
? खर्चाच्या बाबतीत व्याज आणि राज्यांचा कर व शुल्कातील वाटा अनुक्रमे 20 पैसे आणि 22 पैसे इतका राहील.
? संरक्षणावर प्रति ऊपया 8 पैसे खर्च होतील. केंद्रीय क्षेत्रांतील योजनांवरील खर्च प्रत्येक रुपयामागे 16 पैसे, तर केंद्र पुरस्कृत योजनांसाठी वाटप 8 पैसे असे राहील.
? वित्त आयोग आणि इतर हस्तांतरणांवरील खर्च 8 पैसे, तर सब्सिडी व पेन्शनवरील खर्च अनुक्रमे 6 पैसे आणि 4 पैसे असा राहील.
? सरकार प्रत्येक ऊपयातील 8 पैसे ‘इतर खर्चां’साठी खर्च करेल.
Comments are closed.