विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा माजी खेळाडू कोमात; गंभीर आजाराने ग्रासलं, रुग्णालयात उपचार सुरू

ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला एका गंभीर आजाराने ग्रासलं आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तो कोमात असल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मीडिया रिपोर्टनुसार 54 वर्षीय डेमियन मार्टिन यांना मेनिंजायटीसचे निदान झाले आहे. ऑस्ट्रेलियामधील सर्वात स्टायलिश फलंदाज म्हणून डेमियन मार्टिन याच्या नावाचा एकेकाळी दबदबा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डेमियन मार्टिन यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मेनिंजायटीस झाल्याचे निदान झाले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना तात्काळ कोमात ठेवण्यात आले. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. “त्यांना सर्वोत्तम उपचार मिळत आहेत. त्याची पत्नी आणि कुटुंबाला विश्वास आहे की क्रिकेट जगतातील चाहत्यांची प्रार्थना आणि शुभेच्छा त्यांनी शक्ती देईल.” असे माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने न्यूज कॉर्पशी बोलताना सांगितले.
डॅमियन मार्टिन हे ऑस्ट्रेलियाई क्रिकेटमधील एक स्टायलिश फलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 208 वनडे आणि 67 कसोटी सामने खेळले आहेत. मार्टिन 1999 आणि 2003 सालच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. मार्टिनने 2006-07 च्या अॅशेज मालिकेत अॅडलेड कसोटीमध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला आणि क्रिकेट विश्वाला रामराम ठोकला.
हिंदुस्थानच जगज्जेतेपद राखणार! फिरकीवीर हरभजन सिंगची भविष्यवाणी

Comments are closed.