ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अंमली पदार्थांच्या तस्करीत आढळला दोषी

ऑस्ट्रेलियाचा संघ दमदार खेळासाठी ओळखला जातो. संघातील अनेक खेळाडूंनी देशासह लीग क्रिकेटमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. परंतु त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे अनेक आजी माजी खेळाडू विविध प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा एक दिग्गज माजी खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याला अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियन मिडिया रिपोर्टनुसार, माजी ऑस्ट्रेलियन डावखुरा फिरकीपटू स्टूअर्ट मॅकगिल हा कोकेन डीलमध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याला सिडनी जिल्हा न्यायालयाने अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवले आहे. परंतु एप्रिल 2021 मध्ये 33,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.81 कोटी रुपयांच्या एक किलोग्राम कोकनची डील केल्याच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच त्याच्या शिक्षेची सुनावनी आठ आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी न्यायालयात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मॅकगिलने नियमित ड्रग डिलर करणाऱ्या व्यक्तीची त्याचा मेहुणा मारिने सोतिरोपौलोसशी ओळख करुन दिली होती. परंतु मॅकगिलने हा व्यवहार झाला नसल्याचे म्हटल आहे. पण त्याच्या सहभागाशिवाय ड्रग डिल शक्य नसल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला आहे. स्टूअर्ट मॅकगिल ऑस्ट्रेलियाकडून 44 कसोटी सामने खेळला असून त्याच्या नावावार 208 विकेट आहेत. शेन वॉर्नच्या फिरकीच्या जादूमुळे मॅकगिलचा संघात निभाव लागला नाही.

Comments are closed.