माजी ब्रिगेडियर व्हीआर स्वामीनाथन यांचे निधन

कोईम्बतूर:

पाकिस्तानसोबतच्या 1971 च्या युद्धात सहभागी झालेले आणि भारतीय लष्कराच्या विजयात मोलाचे योगदान देणारे तामिळनाडूचे माजी ब्रिगेडियर व्ही. आर. स्वामीनाथन यांचे शनिवारी निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे आहेत.  त्यांच्या पार्थिवावर दि. 15 मार्च रोजी कोईम्बतूर येथे अंत्यसंस्कार येणार आहेत. 1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान, व्ही. आर. स्वामीनाथन हे 22 व्या मराठा लाइट इन्फंट्रीचे कमांडिंग अधिकारी होते आणि त्यांनी हिली रणांगणावर त्यांच्या सैन्याचे नेतृत्व केले. हिली युद्धभूमीवर पाकिस्तानी सैन्याचा पराभव करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रणांगणात पराभव स्वीकारणाऱ्या हजारो पाकिस्तानी सैनिकांनी व्ही. आर. स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. स्वामीनाथन यांनी बांगलादेश मुक्ती युद्धापूर्वी 1961 च्या गोवा लिबरेशन आणि नागालँड विरोधी बंडखोरी ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. ते सैन्यात ब्रिगेडियर पदापर्यंत पोहोचले आणि 1986 मध्ये निवृत्त झाले.

व्ही. आर. स्वामीनाथन यांना कोईम्बतूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांना वृद्धापकाळामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता.   त्यांच्या पत्नी वासंती यांचे आधीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली  आहेत.

Comments are closed.