भारत-पाक सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य, म्हणाला, 'भारताला पराजित करण्यासाठी…'

IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत आणि सुपर 4 मध्ये स्थान निश्चित केले आहे. सुपर 4 मध्ये भारत पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना करेल. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवून सामना जिंकला.

सुपर 4 च्या आधी, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बाझिद खान यांनी एका टीव्ही शोमध्ये टीम इंडियाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की सध्याचा भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूपच मजबूत आणि चांगला आहे. बाझिद यांनी स्पष्टपणे सांगितले की, “भारत समोर मॅन टू मॅन पाकिस्तानला काहीच संधी नाही. भारताला हरवायचे असेल तर टीममध्ये कोणताही सरप्राइज एलिमेंट आणावा लागेल.” त्यांच्या विधानाने सामन्यापूर्वी वातावरण आणखी तापवले.

ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानसमोर 128 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने 7 विकेट्स हातात असताना सहज साध्य केले. हा विजय भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांचीही संतुलित कामगिरी होता. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानची मजबूत फळी सतत दबावाखाली राहिली, तर सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी प्रभावी आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत – अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा, रिंकू सिंग, वरूण चक्रवर्ती.

पाकिस्तान: सॅम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (विकेटकीपर), फखर जामन, सलमान अली आगा (कर्नाधर), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाझ, शाहिन आफ्रिडी, अब्रार अहमद, हुसान तळा मिर्झा, सलमान मुकीम, सूफी

Comments are closed.