गंभीर चांगले प्रशिक्षक, पण ते मैदानावर जाऊन खेळू शकत नाही..’, भारताच्या पराभवानंतर माजी चेन्नई खेळाडूचं वक्तव्य
भारतीय संघाने घरच्या मैदानावर फिरकीपटूंविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही, हे क्वचितच घडते. WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकाने असेच करून दाखवले (Test series IND vs SA). दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी दोन्ही कसोटीमध्ये 25 विकेट घेतल्या आणि 2-0 ने विजय मिळवला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि इतर 3 संघांसाठी खेळलेले शादाब जकाती (Shadab jakati) म्हणाले की, गौतम गंभीर (Gautam Gambhir) चांगले प्रशिक्षक आहेत, पण संघाला चांगले निकाल मिळवण्यासाठी खेळाडूंनी चांगले खेळायचे आहे.
शादाब म्हणाले की, पूर्वी भारतीय फलंदाज स्पिनमध्ये माहिर होते. सचिन, लक्ष्मण, द्रविड यांचा स्तर वेगळा होता. आता खेळाडू जास्त व्हाइट-बॉल क्रिकेट (ODI, T20) खेळतात, त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये फरक पडतो. रेड-बॉलमध्ये सीम, स्विंग असतो, टी20 मध्ये फ्लॅट पिच, टर्न नाही. यामुळे कसोटीमध्ये फलंदाजी कमी प्रभावी झाली आहे.
त्यांनी पुढे सांगितले, आजकालच्या फलंदाजांची क्लास कमी झाली आहे. कसोटी कमी होऊ लागले, व्हाइट-बॉल जास्त, त्यामुळे भारतीय फलंदाजांना फरक पडला.
गौतम गंभीर हेड कोच झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका दुसरी अशी टीम आहे, ज्यांनी भारतात कसोटी मालिका क्लीन स्वीप केली. मागील वर्षी न्यूझीलंडने 3-0 ने भारताला हरवले होते.
शादाब म्हणाले, गौतम गंभीर एक चांगले कोच आहेत, पण मैदानावर खेळू शकत नाहीत. कोचचे काम आहे, व्यवस्थापन, खेळाडूंना प्रोत्साहन देणे, तांत्रिक मार्गदर्शन देणे. मैदानावर खेळाडूंनीच काम करायचे आहे. क्रिकेटमध्ये जिंकते ती टीम, जी चांगली खेळते.
त्यांनी पुढे सांगितले, दोन्ही कसोटीमध्ये भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही कमी पडल्या. दक्षिण आफ्रिका चांगली होती, त्यामुळे त्यांनी विजयी परिस्थिती मिळवली. टीम युवा आहे, अनुभव कमी आहे, पण गंभीर नक्कीच चुका सुधारतील आणि भविष्यात सुधारणा दिसेल.
Comments are closed.