“हे प्रत्येक कर्णधाराचे स्वप्न…” RCB च्या 'या' गोलंदाजाचे फॅन झाले माजी भारतीय प्रशिक्षक

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 42वा सामना गुरूवारी (24 एप्रिल) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान राॅयल्स (RCB vs RR) संघात खेळला गेला. दरम्यान दोन्ही संघ बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने होते. या सामन्यात जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) 33 धावांत 4 विकेट्स घेत आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, अनुभवी वेगवान गोलंदाजाचे सातत्य हे स्पर्धेत प्रत्येक कर्णधाराला हवे असते.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर, राजस्थान रॉयल्सला 4 सामन्यांची पराभवाची मालिका तोडण्यासाठी शेवटच्या 2 षटकांत फक्त 18 धावांची आवश्यकता होती. परंतु हेझलवूडने एक संस्मरणीय षटक टाकले, त्याने फक्त 1 धाव दिली आणि 2 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे आरसीबीचा विजय जवळजवळ निश्चित झाला.

हेझलवूडने शेवटच्या 2 षटकांत 3 विकेट्स घेतल्या आणि फक्त 7 धावा दिल्या. दरम्यान त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. यानंतर संजय बांगल जिओहाॅटस्टारवर बोलताना म्हणाले की, “जोश हेझलवूड प्रत्येक कर्णधाराच्या स्वप्नांप्रमाणे सातत्य आणतो. दबावाखाली तो शांत राहतो, योग्य लांबीने गोलंदाजी करतो आणि प्रत्येक फलंदाजाला नेमके काय गोलंदाजी करायची हे त्याला माहिती आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आरसीबीच्या गोलंदाजीत झालेली सुधारणा मुख्यत्वे त्याच्यामुळेच आहे. दुखापतीमुळे तो बाहेर असतानाचा एक हंगाम वगळता तो त्यांचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यांच्या लांबीमध्ये गोलंदाजी करणे त्याच्या स्वभावात आहे. उसळत्या पृष्ठभागावर, त्याने 4 विकेट्स घेतल्या हे आश्चर्यकारक नाही.”

यंदाच्या आयपीएल हंगामातील जोश हेझलवूडची कामगिरी-

समोर: 9

विकेट्स: 16

गोलंदाजी सरासरी: 17.19

स्ट्राइक रेट: 12.31

उत्कृष्ट गोलंदाजी: 4/33

Comments are closed.