भारतीय संघातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू गायब? टीम मॅनेजमेंटवर माजी क्रिकेटपटू संतापला
टीम इंडियाच्या बाॅर्डर गावस्कर मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता संपूर्ण निवड समिती प्रश्नांच्या भोवऱ्यात आली आहे. खरंतर, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने असा प्रश्न उपस्थित केला आहे की शिवम दुबेची इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत निवड का झाली नाही? गेल्या वर्षी भारताच्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या दुबेने आतापर्यंत गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली फक्त एकच सामना खेळला आहे. त्याला सतत संघाबाहेर ठेवले जात आहे.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडलेल्या संघावर बोलताना म्हणाला की, “शिवम दुबेचे काय झाले? टी20 वर्ल्ड कप विजेता खेळाडूचे संघातून का वगळण्यात आले?
गेल्या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषक 2024च्या अंतिम सामन्यात शिवम दुबेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अतिशय महत्त्वाच्या क्षणी 16 चेंडूत 27 धावांची खेळी केली होती. त्याच संदर्भात आकाश चोप्रा म्हणाला, “जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा संपूर्ण संघाचे कौतुक करायला हवे.” शिवमनेही अंतिम सामन्यात चांगला खेळ खेळला होता. त्याआधी त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबद्दल प्रश्न होते पण तो सर्वात महत्त्वाच्या क्षणी चांगला खेळला. त्याने टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत आठ सामन्यात 133 धावा केल्या होत्या.
भारतीय संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याचा जोडीदार आणि भविष्यातील पर्यायी खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डीला तयार करत आहे. पण, आकाश चोप्राने असा विश्वास व्यक्त केला की, दुबेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यायला हवा होता. त्याच्या टी20 कारकिर्दीत, दुबेने भारतासाठी 33 सामन्यांमध्ये सुमारे 30 च्या सरासरीने 448 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत 11 विकेट्सही घेतल्या आहेत.
हेही वाचा-
Kho Kho WC 2025: टीम इंडियाचा बॅक टू बॅक विजय, दुसऱ्या सामन्यात ब्राझीलला लोळवलं
टीम इंडियाच्या या खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन निश्चित, विराट कोहलीही खेळणार?
टी20 मालिकेत निवड झाली नाही म्हणून या संघाकडून खेळणार रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी मोठा निर्णय
Comments are closed.