“तो फक्त कर्णधार आहे म्हणूनच खेळतोय…”, रियान परागवर माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप; दिलं धक्कादायक विधान
आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी आतापर्यंत शानदार राहिली आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असून अद्याप त्यांना एकही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. संजू सॅमसनच्या RR मधून निरोप घेतल्यानंतर रियान परागला कर्णधार बनवण्यात आले होते. त्याने कर्णधार म्हणून चार सामन्यांत धमाल केली आहे. मात्र, परागची फलंदाजी हा एक मोठा प्रश्न राहिला आहे. RCB विरुद्धच्या सामन्यात रियान पराग केवळ 3 धावा करून बाद झाला. आता माजी भारतीय क्रिकेटपटू के. श्रीकांत यांचा रियानवर संताप अनावर झाला आहे.
RCB विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या 26 चेंडूंत 78 धावांच्या वादळी खेळीमुळे राजस्थान रॉयल्स चांगल्या स्थितीत होती. रियान परागकडे आरामात फलंदाजी करून फॉर्ममध्ये परतण्याची सुवर्णसंधी होती, परंतु जोश हेझलवूडच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात तो बाद झाला.
के. श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर परागच्या फलंदाजीवर कडक टीका केली आणि म्हटले की तो केवळ कप्तानीमुळे संघात आहे. ते म्हणाले, ‘रियान पराग फक्त यासाठी खेळत आहे कारण तो कर्णधार आहे. रियान स्टाईलच्या नादात खूप सहजासहजी बाद झाला. त्याने अनेक सीझन खेळले आहेत आणि फक्त काही प्रसंगीच चांगली कामगिरी केली आहे. RCB विरुद्ध तो केवळ अहंकारामुळे बाद झाला. रियान जबाबदारीने खेळू शकला असता आणि स्वतःला फॉर्ममध्ये आणू शकला असता.’
के. श्रीकांत यांनी भारतीय निवड समितीकडे वैभव सूर्यवंशीला टी-20 संघात स्थान देण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘मी निवडकर्त्यांकडे मागणी करतो की वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर टी-20 संघात स्थान द्यावे. त्याने भारताच्या पुढच्या मालिकेत खेळायला हवे. त्याला आधीच सांगायला हवे की पुढील 15 सामन्यांपर्यंत त्याला संघाबाहेर काढले जाणार नाही. तो एकट्या जीवावर तुम्हाला 8 सामन्यांत विजय मिळवून देईल. त्याने RCB च्या गोलंदाजांना हतबल करून सोडले होते.’
Comments are closed.