बाबर आझमला माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला गुरूमंत्र…! बाबरच्या बॅटमधून पडणार धावांचा पाऊस?
सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) ही मेगा स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची (Babar Azam) बॅट गेल्या अनेक दिवसांपासून शांत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने संथ खेळी केली, तर भारताविरुद्धही त्याने निराशा केली. बाबर सातत्याने धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बाबर त्याला एक मोठा सल्ला दिला आहे.
बासित अली (Basit Ali) यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, सुनील गावस्कर यांनी बाबर आझमच्या कमतरता आणि त्या कशा सुधारायच्या याबद्दल टिप्स दिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला, दरम्यान पाकिस्तान कर्णधार राहिलेल्या बाबर आझमला देखील खूप ट्रोल करण्यात आले.
सुनील गावस्कर म्हणाले, “जर तुम्ही मला टेकनिकबद्दल विचारले तर मी बाबरला फक्त एकच गोष्ट सांगेन की त्याची सध्याची भूमिका खूप मोकळी आहे. जर त्याने त्याची भूमिका थोडी कमी केली तर दोन गोष्टी घडतात. जेव्हा तुमचे पाय उघडे असतात तेव्हा तुम्हाला पुढे-मागे हालचाल करण्यास त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा तोल असतो तेव्हा तुमची उंचीही थोडी वाढते.”
पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, “इथे जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा तुम्हाला चेंडूच्या उसळीची, चेंडूच्या हालचालीची चांगली कल्पना येते, जेव्हा तुम्ही थोडे सरळ असता तेव्हा तुम्हाला थोडी अधिक कल्पना येते आणि सलामीवीर फलंदाजाला ते हवे असते, त्याला दिसू शकेल तिथून थोडी उंची हवी असते, म्हणून तो ते करण्याचा प्रयत्न करेल, मग मला वाटते की त्याचा फाॅर्म परत येईल आणि केवळ पाकिस्तानीच नाही तर संपूर्ण जग त्याचा आनंद घेईल.”
गावस्कर म्हणाले, “बाबरच्या फलंदाजीतली मजा कव्हर ड्राइव्ह मारण्यात आहे. परवा बघा, त्याने किती शानदार शॉट मारला होता, तो मिड-विकेट ड्राइव्हने चौकार मारला. जग हे चित्र पाहण्यासाठी उत्सुक आहे. मला असं हवंय की जर कोणी त्याला सांगितलं आणि तो या गोष्टी करतो, तर कदाचित त्याचा फाॅर्म परत येईल.”
हॅलो @Therealpcb आणि @बाबराझम 258 आपल्यासाठी थोडी सूचना pic.twitter.com/khdiseoymx
– हस (@गोकबोरवॉल्फ) 25 फेब्रुवारी, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
“सचिनचा 100 शतकांचा रेकाॅर्ड मोडू शकतो विराट” माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
अफगाणिस्तानने रचला इतिहास; आयसीसीमध्ये प्रथमच मोठी कामगिरी..!
हार्दिक पांड्या-जास्मिन वालियाच्या नात्याच्या चर्चा! व्हायरल व्हिडिओने वाढवले कुतूहल
Comments are closed.