Asia cup: भारत-पाकिस्तान सामन्यावरून वाद! गांगुलीचा पाठिंबा, तर हा दिग्गज भडकला, म्हणाला…

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया चषक 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले असून, सामने यूएईमध्ये खेळवले जाणार हे निश्चित झाले आहे. मात्र, या स्पर्धेवरून भारतात घमासान सुरू आहे, विशेषतः भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी तीव्र होत आहे. बीसीसीआय आता आशिया चषक किंवा भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलणार नाही, अशाही बातम्या समोर आल्या आहेत. या परिस्थितीत आतापर्यंत कोणत्या क्रिकेटपटूंनी या विषयावर मौन तोडले आहे, ते जाणून घेऊयात. (India vs Pakistan Cricket Match)

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी एएनआयशी बोलताना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला पाठिंबा दर्शवला आणि म्हटले, “मला यावर काही हरकत नाही, खेळ सुरू राहिला पाहिजे. पहलगाम हल्ला व्हायला नको होता आणि दहशतवादाचा खात्मा व्हायला पाहिजे, पण याचा खेळावर परिणाम होता कामा नये.” विशेष म्हणजे, या विधानामुळे सौरव गांगुलीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. (Sourav Ganguly On Asia Cup)

दुसरीकडे, मोहम्मद अझरुद्दीनने आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना निश्चित झाल्याबद्दल ‘दुहेरी मापदंड’ या शब्दाचा वापर केला. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, जर भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळत नसतील, तर त्यांच्यात आशिया चषकातही सामना होऊ नये. अझरुद्दीन म्हणाले, “मी नेहमीच म्हणतो की कोणतीही गोष्ट एकतर पूर्णपणे असावी किंवा पूर्णपणे नसावी. जर आपण पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळत नसू, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांच्यासोबत सामना होऊ नये.” (Mohammed Azharuddin On India VS Pakistan)

जर सर्व सामने आशिया चषक २०२५ च्या वेळापत्रकानुसार (Asia Cup 2025 Schedule) झाले, तर भारतीय संघाला पाकिस्तानसोबतचा सामना 14 सप्टेंबर रोजी खेळायचा आहे. (India vs Pakistan Match Date) आशिया चषक 9 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत चालेल, तसेच या वेळी स्पर्धेत 8 संघ भाग घेणार आहेत. (Asia Cup Start Date)

Comments are closed.