Former minister sudhir mungantiwar said i was a minister by mistake while minister ashish shelar said you are our leader in marathi
Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : महायुती सरकारमध्ये यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद नाकारण्यात आले. ते न मिळाल्याने मुनगंटीवार यांची नाराजी लपून राहिलेली नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुधीर मुनगंटीवार हे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवत असतात. अशीच त्यांची खदखद गुरुवारी सभागृहामध्येच बाहेर पडली. सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रीपदावरून केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनीच त्यांना उत्तर दिले. (former minister sudhir mungantiwar said i was a minister by mistake while minister ashish shelar said you are our leader)
चुकीने मी देखील काही काळ मंत्री होतो
शेतकऱ्यांच्या धानाचा विषय मांडत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहामध्ये चुकीने मी देखील काही काळ मंत्री होतो असे म्हणाले. मात्र, त्यांच्या चुकून हा शब्द त्यांच्याच पक्षाचे सहकारी आणि माहिती – तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांना खटकला. त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना उत्तर दिले. ते म्हणाले की, सुधीर भाऊ म्हणाले, मी चुकून मंत्री होतो, पण तसे नाही. मंत्रिमंडळाने ठरवल्यानंतर मंत्री झाले होते, असे उत्तर शेलार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
हेही वाचा – Jaykumar Gore : तेवढीही नीतिमत्ता त्यांना दाखवता आली नाही, हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना जयकुमार गोरे भावूक
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विधानसभेत पोटतिडकीने बोलणारे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलता बोलता ‘मीही चुकून मंत्री होतो’ असे विधान केले. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना टोले तसेच चिमटे काढले. सुधीरभाऊंच्या त्या विधानावर सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. ‘ते चुकून मंत्री नव्हते, तर मंत्रिमंडळाने ठरवल्याने मंत्री होते, त्याचा आम्हाला अभिमान होता, आहे, असे म्हणत ते विधान कामकाजातून काढण्याची मागणी केली. एवढी चांगली संधी मिळाल्यावर विरोधक कसे शांत बसतील? नाना पटोले यांनी उभे राहत ‘सुधीरभाऊ चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिलेत’ असे म्हणत एकाच वेळी मुनगंटीवार आणि भाजपला टोला लगावला.
सुधीर मुनगंटीवारांनी चुकून मंत्री पदाचा उल्लेख करताच मंत्री आशिष शेलार हे उठले. यावर विधानसभा अध्यक्षांनी त्यांची या प्रश्नावर हरकत आहे का, असा सवाल केला. त्यावर आशिष शेलार म्हणाले, मी सुधीरभाऊंच्या प्रश्नाला कधीच क्रॉस करणार नाही. पण, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. सुधीरभाऊ असं म्हणाले की, मी चुकून मंत्री होतो. ते चुकून मंत्री नव्हते. ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते. ते जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे तेवढं वाक्य काढून टाका, अशी विनंती केली. त्यावर सुधीरभाऊंनी ठीक आहे, काढून टाका. पण धानउत्पादकांवर अन्याय होऊ देऊ नका, अशी विनंती केली. त्यावर कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी संधी साधत ‘सुधीरभाऊ आता चुकून बाहेर राहिले,’ असे म्हटले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी कोटी करत ‘आता ही चर्चा मी चुकून घडवून आणली,’ असे वाटायला देऊ नका, असे म्हणत कामकाज पुढे नेण्याची विनंती केली.
हेही वाचा – Fadnavis On Marathi : शासनाची भूमिका पक्की आहे, भय्याजी जोशी यांच्या विधानावर काय म्हणाले मुख्यमंत्री
Comments are closed.