माजी आमदार, गिलबर्ट मेंडोन्सा,

मीरा-भाईंदर नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 73 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर भाईंदर येथील अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च येथे उद्या बुधवारी दफनविधी करण्यात येणार आहे.

गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा राजकीय प्रवास सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झाला होता. 1978 साली त्यांनी भाईंदर गावच्या सरपंचपदाचा कारभार पाहिला. त्यानंतर 2009 मध्ये मीरा-भाईंदर विधानसभेचे प्रथम आमदार म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून गेले. 2017 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून ते पुन्हा सक्रिय झाले. मीरा-भाईंदर शहराला मुबलक पाणीपुरवठा आणि मीरा रोड, भाईंदर येथून लोकल सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

गेल्या काही वर्षांपासून गिल्बर्ट मेंडोन्सा हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. गेल्या काही महिन्यांपासून मेंडोन्सा आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Comments are closed.