पार्काची माती पुन्हा बोलली! अमेरिकेच्या हरमित सिंगने एसपीजी अकादमीत दिला जुन्या आठवणींना उजाळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयसीसी ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या रंगतदार वातावरणात एक भावनिक क्षण छत्रपती शिवाजी महाराज पार्पवर अनुभवायला मिळाला. अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करणाऱया हरमित सिंगने आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या शिवाजी पार्प जिमखाना अकादमीला भेट देत गुरूंच्या चरणी पृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या रुपाने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्पची माती बोलल्याचा अनुभव आला.

मुंबईत जन्मलेल्या हरमितला डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून याच अकादमीत घडवण्यात आले. माजी कसोटीपटू प्रवीण अमरे आणि फिरकीचे दिग्गज पद्माकर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कारकिर्दीचा पाया रचला गेला. त्याच मेहनतीच्या जोरावर त्याने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकात हिंदुस्थानी संघात स्थान मिळवले. पुढे 2021 साली सिएटल (अमेरिका) येथे स्थायिक झाल्यानंतर त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर अमेरिकन संघात स्थान पटकावले आणि विश्वचषकात पदार्पण करत एक वेगळाच टप्पा गाठला.

श्रेयस अय्यर, शार्दुल ठापूर, तुषार देशपांडे यांच्यासारखे खेळाडूंना घडवणाऱया शिवाजी पार्प जिमखाना अकादमीची परंपरा हरमितने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेली. हिंदुस्थानात विश्वचषक होत असल्याचा आनंद व्यक्त करत त्याने आवर्जून अकादमीला भेट दिली.

याप्रसंगी जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे, सरचिटणीस संजीव खानोलकर, सहाय्यक सचिव सुनील रामचंद्रन, कोषाध्यक्ष विलास सोमण, सनील समेळ, कार्यकारिणी सदस्य तसेच एसपीजी रोझमर्प क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

Comments are closed.