सबरीमाला सोने चोरी प्रकरणी माजी अधिकाऱ्याला अटक
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
केरळच्या शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणासंदर्भात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंदिर व्यवस्थापनातील माजी अधिकारी बी. मुरारी बाबू यांना त्यांच्या चांगनासेरी येथील घरातून अटक केली. एसआयटीने गुरुवारी यासंबंधीची माहिती देताना मुरारी बाबू यांची तिरुवनंतपुरम येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. एसआयटी त्यांना पठाणमथिट्टा येथील न्यायिक प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयात हजर करून कोठडी मागणार आहे. द्वारपाल मूर्ती आणि गर्भगृहाच्या दरवाजाच्या चौकटींवरील सोन्याच्या प्लेट गायब होण्याशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये मुरारी आरोपी आहेत. त्रावणकोर देवस्वम बोर्डच्या (टीडीबी) दक्षता पथकाने प्राथमिक चौकशीनंतर अहवाल सादर करत बोर्डाच्या नऊ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले असून 6 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. आता हे एसआयटी पथक सहा आठवड्यांच्या आत अहवाल सादर करायचा आहे.
Comments are closed.