राज्यसभेचे माजी खासदार एचके दुआ यांचे निधन

नवी दिल्ली :

दिग्गज पत्रकार आणि माजी राज्यसभा खासदार तसेच दोन पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार राहिलेले एच. के. दुआ यांचे बुधवारी निधन झाले आहे. दिल्लीच्या रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दुआ यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. दुआ हे अटलबिहारी वाजपेयी आणि एच. डी. देवेगौडा यांचे माध्यम सल्लागार राहिले होते. तसेच त्यांनी अनेक वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

Comments are closed.