माजी राज्यसभा खासदार थॉमस कुथिरावट्टम

तिरुअनंतपुरम :

केरळ काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी राज्यसभा खासदार थॉमस कुथिरावट्टम यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही काळापासून ते आजारी होते. चेंगन्नूरच्या कल्लिसरी येथील रहिवासी कुथिरावट्टम हे केरळच्या राजकारणातील प्रख्यात चेहरे होते. 1985-91 पर्यंत ते राज्यसभा खासदार होते. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केरळ काँग्रेसचे नेते जोस के. मणि यांनी कुथिरावट्टम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Comments are closed.