अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, चार जणांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिपहर्नियातील स्टॉकटन येथे गोळीबाराची घटना घडली आहे. एका बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. सॅन जोक्विन काउंटी शेरिफ ऑफिसच्या प्रवत्तॉया हीदर ब्रेंट यांनी सांगितले की, मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हल्लेखोरांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण हा टार्गेटेड हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोणत्या उद्देशाने हल्ला करण्यात आला, याचा तपास केला जात आहे.

Comments are closed.