अंबरनाथमध्ये भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, शिंदे गटाच्या उमेदवाराच्या भरधाव कारची दुचाकींना जोरदार धडक

अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱय उड्डाणपुलावर आज रात्री भीषण अपघात झाला. शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे यांच्या भरधाव कारने लेन तोडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना अक्षरशः चिरडले. त्यात एक दुचाकीस्वार थेट पुलावरून खाली कोसळला. ही घटना सीसी टिव्हीत कैद झाली.अपघातात चार जण जागीच ठार झाले.
किरण चौबे या बुवा पाडा येथे चौक सभेसाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. चौबे यांच्या भरधाव कारने लेन सोडून विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱया तीन दुचाकीस्वारांना उडवले. मार लागल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी आहेत मृतांची नावे शैलेश जाधव, चंद्रकांत अनारसे, लक्ष्मण शिंदे (रा. अंबरनाथ) आणि सुमित चेलानी (रा. उल्हासनगर) अशी आहेत.
शैलेश जाधव हे अंबरनाथ नगरपालिकेतील नगररचना विभागाचे कर्मचारी होते तर चंद्रकांत अनारसे हे बांधकाम विभागाचे कर्मचारी होते. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद हे करीत आहेत.

Comments are closed.