Four Maoists gunned down in Gadchiroli district Maharashtra in marathi


गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी जेव्हा नाकाबंदी आणि नक्षलवाद्यांची शोधाशोध सुरू होती तेव्हाच नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोजवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

Naxalite Encounter : गडचिरोली : नक्षलवाद मुक्त भारताचा संकल्प केलेल्या केंद्र सरकारने दिवसेंदिवस नक्षलवादाविरोधातील आपली मोहीम अधिकाधिक तीव्र केली आहे. छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या एका चकमकीत डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड) जवानांनी दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. नारायणपूर येथील अबूझमाड येथील जंगलात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी ही चकमक झाली. त्यानंतर दोनच दिवसात शुक्रवारी महाराष्ट्रातील गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना मारण्यात आलं. (Four Maoists gunned down in Gadchiroli district Maharashtra)

कवाडे भागात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एफओबी (फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस) जवळ महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारपासून एक मोहीम राबवण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा – Supreme Court : हा तर प्रत्येक महिलेचा मूलभूत अधिकार, काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी एक संयुक्त अभियान राबवण्यात आले. यात पोलिसांचे विशेष कमांडोजची तुकडी सी-60 आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात चार नक्षलवादी मारले गेले.

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली. त्यानुसार, 10 हून अधिक सी-60 पार्टी (300 कमांडो) आणि सीआरपीएफच्या एका तुकडीने पाऊस असतानाही कवांडे आणि नेलगुंडा भागातील इंद्रावती नदीच्या किनाऱ्यापासून या अभियानाला सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी जेव्हा नाकाबंदी आणि नक्षलवाद्यांची शोधाशोध सुरू होती तेव्हाच नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडोजवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास थांबून थांबून गोळीबार होत होता. आणि त्यानंतर सुरक्षा दलांना चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांना शस्त्रास्त्रे देखील सापडली.





Source link

Comments are closed.