‘कान’मध्ये चार मराठी चित्रपट; ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’, ‘जुनं फर्निचर’ यांची निवड

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आली आहे.
14 ते 22 मे दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, हा यामागचा हेतू आहे. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांनी चित्रपटांची निवड केली.
Comments are closed.