नासाचे चार अंतराळवीर उद्या चंद्राच्या दिशेने झेपावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नासाने आर्टेमिस-2 मिशनची तयारी पूर्ण केली आहे. 1 एप्रिल 2026 ला नासाचे चार अंतराळवीर 1972 नंतर पहिल्यांदा चंद्राजवळ जाणार आहेत. हे उड्डाण फ्लोरिडाच्या केप केनरवलच्या कॅनेडी स्पेस सेंटरवरून केले जाईल. या चार अंतराळवीरांमध्ये रीड वाइसमॅन, व्हिक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅनसन यांचा समावेश आहे. हे चौघेही 10 दिवसांच्या उड्डाणांमध्ये चंद्राला प्रदक्षिणा घालतील. हे मिशन जवळपास 10 दिवसांचे असेल. चंद्राच्या जवळ वेगाने प्रदक्षिणा घातल्यानंतर हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील. या मिशनमध्ये हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत.

नासाच्या म्हणण्यानुसार, हे मिशन आर्टेमिसचे पहिली क्रूड चाचणी आहे. हे अंतराळवीर ओरियन कॅप्सूलमध्ये बसून अंतराळाच्या दिशेने जातील. ओरियनमध्ये लाइफ सपोर्ट सिस्टम, नेविगेशन, कम्युनिकेशन आणि हीट शील्डची पूर्ण तपासणी केली जाईल. रीड वाइसमॅन 50 वर्षांचे असून ते 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर 165 दिवस होते. व्हिक्टर ग्लोवर 49 वर्षीय असून 2020 मध्ये स्पेसएक्स क्रू ड्रगनने 168 दिवस अंतराळात घालवले आहेत. नासाचे आर्टेमिस कार्यक्रम केवळ मिशन नाही, तर यानंतरही आणखी मिशन येतील.

Comments are closed.