बस दरीत कोसळल्याने चार प्रवाशांचा मृत्यू
नैनितालमधील दुर्घटना : 24 प्रवासी जखमी
वृत्तसंस्था/ नैनिताल
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 24 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रोडवेजची बस भीमतालहून हल्द्वानीला जात असताना दुर्घटना घडली. अपघातसमयी सदर बसमधून 25 ते 30 जण प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या कारला बाजू देण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घटनेच्या बचावाचे व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये राज्य आपत्ती निवारण दलाचे (एसडीआरएफ) कर्मचारी अपघातस्थळी बचावकार्य करताना दिसत आहेत. बुधवार, 25 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा नियंत्रण कक्षाला भीमतालजवळ रोडवेज बसला अपघात झाल्याची माहिती मिळाल्याचे नैनितालचे एसएसपी प्रल्हाद मीना यांनी सांगितले. त्यानंतर नैनिताल आणि खैरना येथून एसडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली.
Comments are closed.