फ्रान्समध्ये मोठी राजकीय उलथापालथ, पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी दिला राजीनामा

फ्रान्समध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने सेबॅस्टियन यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. लेकोर्नू यांनी फक्त एक दिवसापूर्वीच त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली होती आणि ते एका महिन्यापेक्षा कमी काळ या पदावर राहिले.
फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांचा राजीनामा स्वीकारला आहे. लेकोर्नू यांनी यांनी फ्रँकोइस बायरो यांची जागा घेतली होती आणि एका वर्षात ते फ्रान्सचे चौथे पंतप्रधान बनले होते. लेकोर्नू यांना सहकारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे बोलले जात आहे.
लेकोर्नू यांना राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जवळचे सहकारी मानले जातात. लेकोर्नू यांच्या राजीनाम्यामुळे फ्रान्समध्ये मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे, संसदेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. यातच विरोधी नेत्यांनी स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.