औंढ्यातील रथोत्सवात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त नागनाथ मंदिर परिसरात रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या उत्सवा दरम्यान, गर्दीमुळे झालेल्या धक्काबुक्कीमुळे महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. महिलांसोबत असलेल्या युवकांमध्येही हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. मात्र, यावेळी पोलीस व मंदिर प्रशासनाचे कोणतेही कर्मचारी येथे नसल्यामुळे ही हाणामारी बराच वेळ सुरू होती. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त नेमका कुठे होता ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त नागनाथ मंदिर परिसरात मागील काही दिवसांपासून दररोज हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.‌ दरम्यान बुधवारी रात्री मंदिर परिसरात रात्री 10 वाजता रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथोत्सवासाठी हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा विदर्भातील विविध जिल्ह्यातील लाखो भाविक येथे दाखल झाले होते. मंदिर परिसरात लाखो भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे मंदिर प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडूनही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, रथोत्सवातील गर्दीमध्ये झालेल्या धक्काबुक्की महिला भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. महिलांसोबत असलेल्या तरुणांनीही एकमेकांना हाणामारी केल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी मंदिर प्रशासनासह पोलीस कर्मचारी नसल्यामुळे हाणामारीचा प्रकार बराच वेळ सुरू होता. त्यामुळे मंदिर प्रशासनासह पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त नेमका कुठे होता ? असा प्रश्न भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.‌ याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही.

Comments are closed.