दोस्तीत कुस्ती… किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
धुळे : कधी कधी टिंगल टवाळी किंवा किरकोळ वादातूनही हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर, दोस्तीत कुस्ती (Friends) होऊन मित्रा-मित्रांची भांडणेही एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे. धुळे शहरातही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात (POlice) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. हत्याप्रकरणानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. मात्र, किरकोळ वादातून हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने या 25 वर्षीय तरुणाचा मित्रानेच किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केल्याने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी हत्याप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे या तरुणाचा शोध घेतला असता तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील 28 नंबर शाळेसमोर एका सिमकार्ड विक्रेत्याला गौरव माने हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, त्यावेळी त्याला त्याचाच मित्र जयेश वाकडेने सिम कार्ड विक्रेत्याला त्रास देऊ नको असे म्हणत समज दिली. यावरुन दोन मित्रांमध्येच वादाची ठिणगी पडली.
हत्येच्या घटनेनंतर आरोपी फरार
दरम्यान, सिमकार्ड विक्रेत्याला पैसे मागणाऱ्या गौरव माने याने मित्र जयेश पाकळेला व त्याच्या भावाला शिवीगाळ केली. या किरकोळ वादातून जयेश पाकळेने धारदार शस्त्राने गौरव मानेवर वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. धुळे शहर पोलीस संशयीत आरोपी असलेल्या जयेश पाकळे व त्याच्या भावाचा शोध घेत आहेत. खुनाच्या घटनेनंतर आरोपी व त्याचा भाऊ घटनास्थळावरुन पसार झाले असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
अधिक पाहा..
Comments are closed.