मुकेश अंबानी ते आर्यमन बिर्ला! जाणून घ्या सर्व आयपीएल संघांचे मालक आणि त्यांच्या किंमती

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ मध्ये सुरू झाली. यामध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळले गेले. २०२६ च्या हंगामात १० संघ खेळणार असून त्या फ्रॅंचायजीच्या मालकांबाबत जाणून घेऊ. यामध्ये मुकेश अंबानी या मोठ्या उद्योगपतींपासून ते बॉलिवूडच्या आयकॉन्सपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. जसजसा या लीगचा हंगाम पुढे जात राहिला तसतसे या स्पर्धेतील संघांच्या किंमतींमध्ये वाढ होत गेली. याचे नुकतेच उदाहरण राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी).

आरआर आणि आरसीबी या दोन्ही संघांना मंगळवारी (२४ मार्च) दोन नव्या ग्रुपने खरेदी केले आहे. त्यामध्ये दोघांनाही १५ हजारांपेक्षा अधिक कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यांना कोणी खरेदी केले आणि इतर संघांचे मालक कोण हे आपण जाणून घेऊ.

१) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – आदित्य बिर्ला ग्रुप, टाईम्स ऑफ इंडिया, बोल्ट वेंचर्स, आणि ब्लॅकस्टोन्स (१०० टक्के).
आरसीबीला आदित्य बिर्ला ग्रुप, टाईम्स ऑफ इंडिया, बोल्ट वेंचर्स, आणि ब्लॅकस्टोन्स यांनी मिळून १६,७०६ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यांनी यूके-डियाजिओ पीएलसीची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (यूएसएल) कडून १०० टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. या डीलमध्ये आरसीबीचे पुरुष आणि महिला दोन्ही संघांचा समावेश आहे.

२) राजस्थान रॉयल्स – आधीचे मनोज बदाले (६५ टक्के), लाचलान मर्डोक (१५ टक्के), टायगर ग्लोबल आताचे कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी समूह.

मनोज बदाले हे इमर्जिंग मीडियाच्या माध्यमातून बहुसंख्य मालक असून सध्या या फ्रॅंचायजीची विक्री नुकतीच पार पडली असून त्याला कल सोमानी यांच्या ग्रुपने १५३०१ कोटी रुपयांना घेतले आहे. २००८ च्या तुलनेत यामध्ये अधिक वाढ झाली आहे.

3) मुंबई इंडियन्स – या संघाची संपूर्ण १०० टक्के मालकी हक्क रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांच्या नेतृत्वाखालील ही फ्रॅंचायजी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. पाच आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या या संघाची सध्याची किंमत २४२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक) आहे.

४) चेन्नई सुपर किंग्ज – एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड.
मार्च २०२६ पर्यंत चेन्नईची मालकी इंडिया सिमेंट्समधून विभक्त झालेली असून आता चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडकडे आहे. तसेच एन श्रीनिवासन यांचे अधिक नियंत्रण आहे. या फ्रॅंचायजीची किंमत अंदाजे २३५ दशलक्ष डॉलर्स ( सुमारे २००० कोटी रुपयांपेक्षा अधिक). या संघानेही पाच आयपीएल विजेतेपद जिंकले असून सर्वात लोकप्रिय फ्रॅंचायजीपैकी एक आहे.

५) कोलकाता नाईट रायडर्स – शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता.
तीन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या केकेआरची सध्याची किंमत २२२ दशलक्ष डॉलर्स ( अंदाजे २०५३ कोटी रुपये) असून आयपीएलमधील महत्वाच्या फ्रॅंचायजीपैकी एक आहे. याचे मालकी हक्क बॉलिवूडचा आयकॉन शाहरुख खान (रेड चिलीज एंटरटेनमेंट) आणि मेहता ग्रुपचे जय मेहता, जुही चावला यांच्याकडे आहेत. काही वृत्तानुसार, शाहरुख ९० टक्के भागीदारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

६) सनरायझर्स हैद्राबाद – काव्या मारन (सन टीव्ही ग्रुप)
हैद्राबादच्या फ्रॅंचायजी सन ग्रुपचे कलानिधी मारन यांच्या मालकीची आहे. त्यांची मुलगी काव्या मारन सीईओ असून ती सर्व कामकाज सांभाळते. आरसीबीच्या व्यवहारानंतर हैद्राबादच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

७) दिल्ली कॅपिटल्स – सज्जन जिंदाल (५० टक्के) आणि पार्थ जिंदाल (५० टक्के)
दिल्ली कॅपिटल्स संघ जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्लू ग्रुप यांच्यात ५०-५० च्या परिपूर्ण भागीदारी अंतर्गत कार्यरत आहे. ही फ्रॅंचायजी अंदाजे १५२ दशलक्ष डॉलर्स आहे.

८) गुजरात टायटन्स – टोरेंट ग्रुप (६७ टक्के) आणि सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स (३३ टक्के)
मेहता कुटुंबाच्या नेतृत्वाखालील टोरेंट ग्रुपने २०२५ च्या सुरूवातीला काही भांडवल संपादन केले. जागतिक खाजगी इक्विटी क्षेत्रातील सीव्हीसी कॅपिटल एक अल्पसंख्य भागीदार आहे. या नव्या फ्रॅंचायजीमध्ये झालेल्या मोठ्या गुंतवणूकीमुळे त्याची किंमत सध्या अंदाजे १४२ दशलक्ष डॉलर्स आहे.

९) पंजाब किंग्ज – प्रीती झिंटा (२३ टक्के), मोहित बर्मन (४६ टक्के), नेस वाडिया (२३ टक्के) करन पॉल (८ टक्के)
प्रीती झिंटा ही पंजाब किंग्ज फ्रॅंचायजीचा प्रमुख चेहरा आहे. यामध्ये डाबरचे मोहित बर्मन यांचा सर्वात मोठा हिस्सा आहे. ही फ्रॅंचायजी अंदाजे १४१ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे १२१९ कोटी रुपये) आहे.

१०) लखनऊ सुपर जायंट्स – संजीव गोयंका (१०० टक्के)
संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने २०२१मध्ये विक्रमी बोली लावून एलएसजीची संपूर्ण मालकी मिळवली आहे. त्यांनी हा संघ ७०९० कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्याची सध्या किंमत १२२ दशलक्ष डॉलर्स (१०५४ कोटी रुपये) आहे. हा ग्रुप सध्या १ अब्ज डॉलरच्या मुल्यांकनावर काही हिस्सा विकण्याच्या विचारात आहे.

Comments are closed.