एस श्रीसंथ ते संजू सॅमसन, वर्ल्ड कप विजयासाठी केरळचे खेळाडू टीम इंडियासाठी लकी?

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा विजेता भारत ठरला. रविवारी (८ मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा आणि ऐतिहासिक तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाची मोलाची कामगिरी संजू सॅमसनने पार पाडली. त्याने ८९ धावा केल्या भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला २५६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते.
संजू हा इतिहासात दोन टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला केरळचा खेळाडू ठरला आहे. तो २०२४मध्ये संघाचा भाग होता आणि भारत तेव्हा विजेता ठरला होता. आता त्याने २०२६च्या आवृत्तीमध्ये संघाच्या अंतिम अकरामध्ये खेळताना विजयासाठी महत्वाच्या सामन्यात मोठ्या खेळी केल्या आणि संघाच्या विजयात मोठी कामगिरी बजावली. त्याने यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ नाबाद ९७ धावा आणि इंग्लंड विरुद्ध उपांत्य सामन्यात ८९ धावा केल्या होत्या.
भारताच्या विश्वचषक विजयासाठी केरळचे खेळाडू लकी?
संजू सॅमसन- संजू २०२४च्या टी२० विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात होता. तेव्हा त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही, मात्र संघाने चषक जिंकल्याने त्यालाही विजेतेपदक मिळाले. आता २०२६मध्ये त्याने ५ सामन्यात खेळताना ३२१ धावा केल्या आणि मालिकावीराचा पुरस्कारही जिंकला. तो आता टी२० विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने २०१४मध्ये ३१९ धावा केल्या होत्या.
सुनील व्हॅल्सन – माजी वेगवान गोलंदाज असलेले सुनील केरळचे रहिवासी राहिले आहे. ते १९८३च्या वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होते. तेव्हा भारताने अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिल्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली होती. संजूप्रमाणे सुनील यांनीही त्या विश्वचषक स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. सुनील याला या स्पर्धेत खेळण्याची आशा जवळपास नव्हतीच, मात्र रॉजर बिन्नीच्या दुखापतीमुळे तेव्हाचे भारतीय कर्णधार कपिल देव यांनी त्यांना तयार राहण्यास सांगितले होते. तसे रॉजर नंतर ठिक झाले.
एस श्रीशांत – श्रीसंथ हा भारताच्या दोन विश्वविजेत्या संघाचा भाग राहिला आहे आणि तो ही केरळचाच आहे. त्याने २००७च्या टी२० विश्वचषकाच्या पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात मिसबाह उल हकची शेवटची विकेट घेतली आणि संघाचा विजय पक्का केला. तसेच तो २०११च्या वनडे विश्वचषकातही खेळला. तो श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघाचा भाग होता.
Comments are closed.