क्रीडानगरीतून – आयडियल चषक 15 नोव्हेंबरपासून

बाल दिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अॅपॅडमीतर्फे एलआयसी पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक 14 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा 15 नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा 16 नोव्हेंबर रोजी परळ येथील आरएमएमएस सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 14 वर्षांखालील मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण 120 पुरस्कार असून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण 25 रोख पुरस्कारांसह प्रथम पुरस्कार रोख रुपये पाच हजारांसह आकर्षक एलआयसी-आयडियल चषक आहे. तसेच खुल्या स्पर्धेतसुद्धा 13 वर्षांखालील विविध वयोगटासाठी विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजाबाबू गजेंगी (93247 19299) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युनियन अॅकॅडमीची जेतेपदाची हॅटट्रिक
ठाणे ः सन्मित कोथमिरेचे झुंजार द्विशतक आणि दोन बहुमोल भागीदाऱयांमुळे युनियन क्रिकेट अॅकॅडमीने पहिल्या डावातील मोठय़ा आघाडीच्या जोरावर क्लब कमिटी आयोजित तिसऱया शताब्दी चषक 14 वर्षांखालील एमसीए निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन विरुद्धच्या अंतिम सामन्यात दुसऱया दिवशी बिनबाद एक धावेवरून पुढे खेळताना सन्मितने आपली छाप पाडली. सन्मितने 34 चौकारांसह नाबाद 219 धावा करत संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. आपल्या द्विशतकी खेळीत सन्मितने सिद्धांत सिंगसह चौथ्या विकेटसाठी 150 धावांची आणि अमर बी. के.सोबत सहाव्या विकेटसाठी 198 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या.
नीलांश उपांत्य फेरीत
गुहागर ः भंडारी हॉल येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन पॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या नीलांश चिपळूणकरने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संदीप देवरूखकरला 25-12, 16-2 असे सहज दोन सेटमध्ये हरवून स्पर्धेत खळबळ माजवली, तर महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर चुरशीचा विजय मिळवला.

Comments are closed.