मैदानातून रुग्णालयात, आणि आता सरळ ट्रेनिंगला! कधी होणार श्रेयस अय्यरचे कमबॅक?
श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला लगेच मैदानाबाहेर जावे लागले आणि नंतर समोर आले की त्याला स्प्लीन इन्जरी झाली आहे. यामुळेच तो रुग्णालयात दाखल झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अय्यरची निवड झालेली नाही आणि काही महिन्यांसाठी तो बाहेर राहणार असल्याची माहितीही समोर येते आहे. मात्र, अय्यरचा निर्धार मात्र वेगळाच दिसतोय. तो शक्य तितक्या लवकर मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की श्रेयस अय्यर कदाचित न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका मिस करू शकतो आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांतही तो दिसणार नाही. तिल्लीला झालेल्या दुखापतीनंतर अय्यर काही महिन्यांसाठी बाहेर राहील असं वाटत होतं. मात्र, अय्यरची नजर शक्य तितक्या लवकर पुनरागमन करण्यावरच आहे.
अय्यरने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, ज्यात तो जिममध्ये सायकलिंग करताना दिसत आहे. फिट राहण्यासाठी आणि लवकरात लवकर पुनरागमन करण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशाच प्रकारे श्रेयसने ट्रेनिंग सुरू ठेवले, तर अपेक्षेपेक्षा लवकर त्याची मैदानात परतफेड होऊ शकते.
श्रेयस अय्यर वनडे संघात टीम इंडियाचे उपकर्णधार आहे आणि नंबर 4 वर फलंदाजी करतो. तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, पण सध्या दुखापतीमुळे त्याला मैदानापासून दूर राहाव लागत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो उपलब्ध नाही.
त्याच्या जागी नंबर 4 वर टीममध्ये पुनरागमन करणारा रिषभ पंत खेळू शकतो. पंतसोबत तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड आणि नीतीश कुमार रेड्डी हेही चांगले पर्याय ठरू शकतात. अय्यरची रिकव्हरी व्यवस्थित झाली, तर तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही परत येऊ शकतो.
Comments are closed.