IPL 2025 मध्ये हे 5 अनकॅप्ड खेळाडू बदलू शकतात सामना! त्यांच्यावर असेल विशेष लक्ष!

आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघांमध्ये होणार आहे. त्याचबरोबर या हंगामात नेहमीप्रमाणे अनकैप्ड खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे. हे खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनामुळे लोकांचे लक्ष वेधू शकतात. आता आपण पाहूया की, ते कोणते 5 खेळाडू असणार आहेत,जे आयपीएलच्या 18 व्या हंगामात मध्ये त्यांच्या खेळाची जादू दाखवू शकतात.

वैभव सूर्यवंशी

राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 विरुद्ध 58 चेंडूंमध्ये शतक केले होते. याशिवाय अंडर 19 आशिया कप मध्ये सुद्धा शानदार फलंदाजी केली होती. यावेळी वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्प मध्ये राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली ट्रेनिंग करत आहे. तसेच वैभव सूर्यवंशी याचे वय फक्त 13 वर्ष आहे. यामध्ये जर वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वय असलेला खेळाडू ठरू शकतो.

रॉबिन मिन्ज

आयपीएलच्या मेगा लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाने रॉबिन मिंज या खेळाडूला 65 लाख रुपयांना खरेदी केले होते. रॉबिन मिंज घरेलु क्रिकेटमध्ये झारखंडसाठी खेळतो. हा खेळाडू ताबडतोब फलंदाजी शिवाय यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. आयपीएल 2024 हंगामामध्ये रॉबिन गुजरात टायटन्स संघाचा हिस्सा होता, पण रस्त्यात झालेल्या त्याच्या अपघातामुळे तो हंगामात खेळू शकला नाही.

सूर्यश शेज

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सूर्यांश शेडगेने 15 चेंडू 36 धावा नाबाद केल्या होत्या. त्याने त्याच्या डावात 3 चौकार आणि 3 षटकार केले होते. या सामन्यात त्याचा संघ मध्यप्रदेश विरुद्ध 175 धावांचा पाठलाग करत होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सूर्यांश शेडगेने 252 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याशिवाय त्याने 8 विकेट्स घेतल्या. यानंतर आयपीएल मेगा लिलावात पंजाब किंग्सने सूर्यांश शेडगेला त्यांच्या संघात स्थान दिले.

आंद्रे सिद्धार्थ

आंद्रे सिद्धार्थ तमिळनाडूचा दिग्गज एस शरदचा भाचा आहे. सी आंद्रे सिद्धार्थ तमिळनाडू प्रीमियर लीग शिवाय रणजी ट्रॉफी मध्ये खेळलेला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सिद्धार्थने 68 च्या ऍव्हरेजने 612 धावा केल्या होत्या. सिद्धार्थ बद्दल म्हटले जात आहे की, तो येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या खेळाडू होऊ शकतो.

बेवन जेकब्स

न्यूझीलंडचा बेवॉन जैकब्स मुंबई इंडियन्स संघाचा हिस्सा आहे. त्याने सुरुवातीच्या 6 टी20 सामन्यांमध्ये 189 धावा केल्या आहेत. आत्तापर्यंत बेवॉन जैकब्स 20 टी20 सामने खेळलेला आहे. त्यामध्ये या फलंदाजाने 150 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Comments are closed.