आता WTC मध्ये भारतासाठी कठीण आव्हानं..! पहा संपुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Schedule Of India WTC 2025-27: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (India vs England Test Series) त्यासाठी शनिवारी (24 मे) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. याच इंग्लंड दौऱ्याने भारतीय संघाचे नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) सायकल सुरू होत आहे. तसेच, भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाल्यासारखे आहे. शुबमन गिल नवीन कसोटी कर्णधार झाला आहे आणि बऱ्याच काळानंतर भारतीय कसोटी संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय खेळणार आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतरही भारतासमोर अनेक कठीण आव्हाने आहेत.

चला तर मग 2025-27च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक कसे असणार याबद्दल जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये, एका संघाला 6 कसोटी मालिका खेळायच्या असतात, त्यापैकी 3 मायदेशात आणि 3 परदेशी भूमीवर खेळल्या जातात. दरम्यान भारताचे पहिले आव्हान 20 जूनपासून सुरू होत आहे कारण इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका या दिवसापासून सुरू होणार आहे. इंग्लंडच्या हिरव्या गवताळ खेळपट्ट्यांवर चेंडू प्रचंड स्विंग होईल. त्याच वेळी, रोहित आणि विराटशिवाय हा दौरा अडचणींनी भरलेला असू शकतो.

त्यानंतर, भारत 2 देशांचे यजमानपद भूषवेल आणि घरच्या मालिका खेळेल. ऑक्टोबरमध्ये, वेस्ट इंडिज संघ 2 कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात येईल आणि नोव्हेंबरमध्ये, दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील 2 कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा करेल. 2026च्या बाबतीत, भारत त्या वर्षी फक्त 4 कसोटी सामने खेळेल जे वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात असेल. ऑगस्ट 2026 मध्ये, भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करेल, तर ऑक्टोबर 2026 मध्ये भारताा न्यूझीलंडचा दौरा करावा लागेल.

भारतीय संघाचा 2025-27ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धा 2023-25 प्रमाणेच संपेल. म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या फायनल सामन्यापूर्वी, भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (BGT) ऑस्ट्रेलियाचा सामना करेल, परंतु यावेळी फरक असा असेल की ऑस्ट्रेलियन संघ भारताचा दौरा करणार आहे.

2025-27 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे संपूर्ण वेळापत्रक-

भारत विरुद्ध इंग्लंड (परदेशी दौरा) – 5 कसोटी – जून-ऑगस्ट २०२५
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (मायदेशी) – 2 कसोटी – ऑक्टोबर 2025
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मायदेशी) – 2 कसोटी – डिसेंबर 2025
भारत विरुद्ध श्रीलंका (परदेशी दौरा) – 2 कसोटी – ऑगस्ट 2026
भारत विरुद्ध न्यूझीलंड (परदेशी दौरा) – 2 कसोटी – ऑक्टोबर-डिसेंबर 2026
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मायदेशी) – 5 कसोटी – जानेवारी-फेब्रुवारी 2027

Comments are closed.