मुंबई पोलिसांच्या अश्व दलासाठी १ कोटी २७लाखांचा निधी वितरित
मुंबई पोलीस दलाच्या माउंडेट पोलीस युनिट अर्थात अश्व दलासाठी राज्याच्या गृह विभागाने १ कोटी २७ लाख १० हजार ५८१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
मुंबई पोलीस दलात अत्याधुनिक वाहने आणि गस्त घालण्यासाठी मोटरसायकल आहेत, पण वाहतूक नियंत्रण, गर्दीची ठिकाणे, चौपाटीवर गस्त घालता यावी यासाठी मुंबई पोलीस दलात अश्वदलाचा समावेश करण्यात आला आहे. साधारणपणे डिसेंबर १९३२ मध्ये पोलीस दलातील माउंटेड पोलीस युनिट बंद करण्यात आले होते; पण २०११ मध्ये मुंबई पोलीस दलात जवळजवळ ७७ वर्षांनंतर माउंटेड पोलीस युनिट पुन्हा सुरू करण्यात आले.
अलीकडेच १३ नव्या अश्वांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. आता या पथकातील अश्वांची संख्या १६ झाली आहे. आता या निधीतून नवीन घोडे विकत घेण्यात येतील. त्याशिवाय अश्वांसाठी सॅलिडरी, साहित्य खरेदी, अश्व वैद्यकीय तपासणी खर्च, प्रशिक्षकांचे वेतन यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
Comments are closed.