जी-7 च्या बैठकीत मोदी-ट्रम्प यांचे फक्त हाय-हॅलो, गळाभेट नाही!
जी-7 राष्ट्रांच्या बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली. होर्मुझच्या समुद्रात अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते समोरासमोर आले. यावेळी दोघांनी हाय-हॅलो आणि हस्तांदोलन केले. मात्र, यावेळी दोन्ही नेत्यांची गळाभेट न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
फ्रान्समधील इव्हियान शहरात जी-7 राष्ट्रांची 52वी शिखर परिषद होत आहे. या निमित्ताने अमेरिका, इंग्लंडसह फ्रान्स, जर्मनी, पॅनडा, जपान आणि इटालीचे नेते एकत्र आले आहेत. हिंदुस्थान या शिखर परिषदेत अतिथी देश म्हणून सहभागी होतो. परिषदेत सहभागी होण्याची हिंदुस्थानची ही 13 वी वेळ आहे. परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या विविध नेत्यांसोबत बैठका होणार आहेत.
अमेरिकेसोबत आज द्विपक्षीय चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बुधवारी पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. फेब्रुवारी 2025 नंतरची ही पहिली द्विपक्षीय बैठक आहे. हिंदुस्थान-अमेरिकेतील मुक्त व्यापार कराराच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानी खुलाशांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करून निषेध नोंदवणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Comments are closed.