गडचिरोलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची संपवलं, अपघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकला
गडचिरोली क्राईम न्यूज : गडचिरोली (Gadchiroli ) जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर त्याच पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे या दोघांना पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. देवानंद सूर्यभान डोंगरवार असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
पघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकून बनाव रचला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर हा प्रकार अपघात वाटावा म्हणून मृतदेह पुलाखाली फेकून बनाव रचला. मात्र पोलीस तपासात हत्येचा उलगडा झाला. देवानंद याने 2018 मध्ये आंधळी येथील रेखाशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र काही काळापूर्वी रेखा राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या प्रेमात पडली. दोन महिन्यांपूर्वी तिने देवानंदचा संसार सोडला आणि ती कुरखेडा येथे विश्वजीतसोबत राहू लागली. देवानंदने तिला वारंवार घरी परतण्याचे आवाहन केले. तंटा मुक्ती समितीनेही मध्यस्थी केली. मात्र रेखाने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार देत होती.
वाद विकोपाला गेला आणि रेखा व विश्वजीतने मिळून देवानंदच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला
घटनेच्या दिवशी देवानंद पत्नीला भेटण्यासाठी कुरखेडा येथील तिच्या भाड्याच्या घरी गेला होता. रात्री उशिरा तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि रेखा व विश्वजीतने मिळून देवानंदच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला. यामध्ये देवानंदचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवर बसवून सती नदीच्या पुलाजवळ नेला. तिथे रस्ते अपघात वाटावा म्हणून मृतदेह फेकून देत दुचाकीची तोडफोड केली. मात्र, हत्येच्या ठिकाणापासून ते पुलापर्यंत रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या थेंबांनी हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
दोन महिन्यापासून रेखा आणि देवानंद वेगळे राहत होते
दरम्यान, देवानंद सूर्यभान डोंगरवार याने 2018 मध्ये आंधळी येथील रेखाशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र काही काळापूर्वी रेखा राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या सातत्याने गाठी भेट होत होत्या. त्यानंतर रेखाने आपला पती देवानंद डोंगरवार याच्याशी सगळे संबंध तोडून संसार सोडला होता. दोन महिन्यापासून रेखा आणि देवानंद वेगळे राहत होते. रेखा कुरखेडा येथे विश्वजीतसोबत राहत होती.
आणखी वाचा
Comments are closed.