82 गुन्हे, 31 चकमकींसह अनेक नक्षली कारवाईत सहभाग; लाखांचे बक्षीस असलेले 4 जहाल माओवादी शरण
गडचिरोली : तब्बल 28 लाख रुपये बक्षीस असलेल्या एक वरिष्ठ कॅडरच्या नक्षलसह एक एरिया कमिटी मेंबर आणि दोन सदस्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण (Gadchiroli Naxal) केलंय. अशोक सडमेक उर्फ चंद्रशेखर, वनिता झोरे, साधू मोहंदा आणि मुन्नी कोरसा असे आत्मसर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. अशोक हा नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेता असून वनिता टेक्निकल टीमची सदस्य तर साधू आणि मुन्नी ह्या सदस्य आहेत. अशोक वर 82 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 31 चकमक 17 जाळपोळ आणि 34 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर शासनाने 16 लाखांचे बक्षीस ठेवले होते. तर वनिता हिच्यावर 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये एक चकमक, दोन जाळपोळ 8 इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. तिच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस होते.
तसेच साधूवर चार गुन्हे दाखल असून त्याच्यावर चार लाखाचे तर मुन्नीवर दोन लाखाचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांच्या टीसीओसी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे. कारण याच कालावधीमध्ये नक्षल चळवळ आक्रमक होत असते.
नक्षलवाद्यांच्या टीसीओसी मोहीम म्हणजे काय?
दरम्यान फेब्रुवारी ते जून या कालावधीत नक्षलवादी संघटना नक्षलप्रभावित भागात टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेन (TCOC) चालवतात. या 4 ते 5 महिन्यांत नक्षलवाद्यांकडून राबवले जाणारे ‘टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’ म्हणजेच टीसीओसी पोलिसांसाठी शहीद आठवड्यापेक्षा काही अंशी आव्हानात्मक असल्याचे बोलले जाते. कारण याच कालावधीत नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अलिकडे पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या तळावर केलेले हल्ले आणि अनेक डाव उधळल्यानंतर नक्षली चळवळ काहीशी खिळखीळी झाली आहे. तर पोलीसही याच कालावधीत नक्षलवादाच्या माध्यमातून देशाच्या व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या सशस्त्र लढाईला चोख प्रतिउत्तर देतात.
गडचिरोली जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे 404 कोटींच्या निधीची मागणी
गडचिरोली जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक आज (3 फेब्रुवारी) दूरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तर मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेला निधी अद्याप का खर्च झाला नाही, काय अडचण आहे, याबाबत विचारणा करून अधिकाऱ्यांचे कान टोचले आणि निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.