माओवाद विरोधातील लढाईला सर्वात मोठं यश; वेणुगोपाल राव 60 सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण


गॅचिरोली नक्षल्यांना बातम्या: माओवाद संदर्भातील आजवरची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police)  आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या माओवाद विरोधातील (Gadchiroli Naxalites News) लढाईला आजवरचं सर्वात मोठं यश मिळवा झालं आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची खात्रीलायक माहिती आहे. काल (14 ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे.

Gadchiroli Naxalites News : वेणुगोपाल राव 60 सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दरम्यानगेले काही दिवस सातत्याने सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्रमाओवादाचा मार्ग सोडला पाहिजे, आणि सरकारसोबत शांतता वार्ताकरून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी आले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. सेंट्रल कमिटीच्या उर्वरित सदस्यांनी त्याच्या या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला होता आणि तसे पत्रक काढत ही सोनू उर्फ भूपतीची वैयक्तिक भूमिका असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सोनू उर्फ भूपतीच्या सशस्त्र माओवाद सोडून शांतता वार्ता केली पाहिजे, या प्रस्तावाचा परिणाम माओवाद्यांच्या खालच्या कॅडरवर व्हायला लागला होता.

Gadchiroli Police : शरणागती पत्करण्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनाही यश

अशातचकाही दिवसांपूर्वी गडचिरोली डिव्हिजन ने एकत्रितरीत्या पत्रक काढत सोनू उर्फ भूपतीच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर उत्तर बस्तर आणि माड डिव्हिजन मधील काही नक्षल कमांडर स्नेही तशाच पद्धतीचे पत्रक काढले होते. त्या,.मुळे सोनू उर्फ भूपती लवकरच शरणागती पत्करेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र तो प्रामुख्याने छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये शरणागती पत्करेल, अशी स्थिती असताना महाराष्ट्र पोलिसांनी बाजी मारली आणि सोनू उर्फ भूपतीचा शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करण्या संदर्भात मन वळवण्यात यश मिळवलंहे?

Gadchiroli Naxal: लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णपणे हद्दपार

मिळालेल्या माहितीनुसारकाल रात्री दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह दहा डीव्हीसीएम आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी कमांडर ने आपले शस्त्र खाली ठेवले आणि गडचिरोली पोलिसांना शरण आले आहे. या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर होणार असून लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णपणे हद्दपार झाला, असं म्हणण्याची वेळ येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.