गेलच्या पाईपलाईनमध्ये बिघाड, मुंबई, ठाणेसह नवी मुंबईमध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम

चेंबूरमधील आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, ठाणेसह नवी मुंबईत सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी, बस, खाजगी वाहनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती गॅस पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.
गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने वडाळा येथील MGLच्या सिटी स्ठेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. यामुळे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील वाहनधारकांना सीएनजी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून लवकर सीएनजी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने निवेदनाद्वारे सांगितले.

Comments are closed.