वादळ वारे, गारांचा वर्षाव; अवकाळी पावसाने कोल्हापूरला झोडपले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या काही दिवसांपासून शक्यता वर्तविली जात असलेल्या अवकाळी पावसाने आज कोल्हापूरला झोडपले. हवामान खात्याने आज सायंकाळी सातच्या सुमारास ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. पावणेसातच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि गारांच्या वर्षावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे सर्वच ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वत्र अंधार पसरला होता.

गेल्या महिनाभरापासूनच तापमानातील वाढ पाहता, यंदाचा उन्हाळा अत्यंत त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आहे. तापमान 36 अंशांपर्यंत जात असल्याने अवघे कोल्हापूरकर घामाघूम झाले होते. वाढता उकाडा पाहता, सर्वांना पावसाच प्रतीक्षा लागून राहिली होती. आज हवामान खात्याकडून दुपारी जिह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. तसेच विजा पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. आजचा अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसाने आज तासभर शहरासह काही भागांत जोरदार हजेरी लावली.

Comments are closed.