'गंभीर' विषय! या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावले खडे बोल
ऑस्ट्रेलिया दौऱासाठी टीम इंडिया संघ जाहीर झाला आहे. (The India team squad has been announced for the Australia tour). भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळायचे आहेत. या दोन्ही मालिकांसाठी निवडलेल्या संघात 7 खेळाडू असे आहेत जे वनडे आणि टी20 दोन्ही संघात समाविष्ट आहेत. पण या खेळाडूंमध्ये एक असा खेळाडू आहे ज्याच्या संघात निवडीवर माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि वर्ल्ड चॅम्पियन कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भारतीय संघात सलग मोठे बदल होत आहेत. यावर माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत यांनी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.(Cricketer Kris Srikkanth has raised questions over the management).
श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “सलग अशा निवडींमुळे ते खेळाडूंनाही गोंधळात टाकत आहेत. इतकच नाही तर आपल्यालाही कधी कोणाला संघात संधी मिळेल हे समजत नाही. अचानक यशस्वी जयस्वालला संघात घेतले जाते आणि नंतर लगेचच त्याला संघाबाहेर बसवले जाते. श्रीकांत यांनी पुढे सांगितले की, अशा सलग बदलांमुळे खेळाडूंचा मनोबल कमकुवत होतो.”
क्रिस श्रीकांत यांनी पुढे सांगितले की, “टीम इंडियामध्ये फक्त एकच कायमस्वरूपी खेळाडू आहे, तो म्हणजे हर्षित राणा. कोणीही समजून घेत नाही की तो संघात का आहे. तुम्ही जे चांगले काम करत आहेत अशा खेळाडूंना निवडत नाही, पण जे काहीही करत नाहीत अशा खेळाडूंना संघात घेतले जाते.” श्रीकांत यांनी पुढे सांगितले की, “तुम्हाला 2027 वर्ल्ड कपची तयारी सुरू करावी लागेल, पण मला वाटते की तुम्ही तसे करत नाहीत.”
क्रिस श्रीकांत यांनी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर टीका करत सांगितले की, “हर्षित राणासारखे होणे योग्य आहे, जे संघात निवड होण्यासाठी त्यांच्या होकाराला होकार देत राहतात. जर तुम्ही हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी यांना संभाव्य खेळाडूंच्या यादीत घेतले, तर तुम्हाला वर्ल्ड कपची ट्रॉफी विसरावी लागेल.”
Comments are closed.