गौतम गंभीर यांनी या 5 खेळाडूंचं करिअर संपवलं का? चांगली कामगिरी करूनही संधी नाही!
भारतीय निवड समितीने आशिया कप 2025 (Ashiya Cup 2025) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. चांगली कामगिरी करूनही काही खेळाडूंना या संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयवर मोठे प्रश्न विचारले जात आहेत. चाहत्यांचा आरोप आहे की, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आपल्या आवडत्या खेळाडूंनाच संधी देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, गंभीर यांनी 5 खेळाडूंचं करिअर संपवलं आहे.
घरेलू क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सतत धावा केल्यानंतरही मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) टी20 आणि कसोटी संघात जागा मिळालेली नाही. चाहत्यांचं मत आहे की, यामागेही गौतम गंभीरच मोठं कारण आहेत. याशिवाय युजवेंद्र चहल (Yujvendra chahal) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांनाही कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी मिळालेली नाही. चहल काऊंटी क्रिकेटमध्ये चांगलं खेळत आहे, तर भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये शानदार पुनरागमन केलं होतं. याशिवाय ऋतुराज गायकवाडलाही (Ruturaj Gaikwad) संघाबाहेर करण्यात आलं आहे.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. तसेच निवडलेल्या खेळाडूंपैकी किती खेळाडू आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करतात याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.