महत्त्वाच्या सामन्यापूर्वी किती खेळाडू फिट, कोण जखमी? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिली मोठी अपडेट
एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 (Anderson Tendulkar Trophy 2025) आता अंतिम टप्प्यात आली आहे. चौथा कसोटी सामना झाल्यानंतर सध्या ही मालिका 2-1 अशा स्थितीत इंग्लंडच्या बाजूने झुकलेली आहे. त्यामुळे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात टीम इंडिया (Team india) मालिका बरोबरीत आणण्यासाठी आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन घेऊन मैदानात उतरेल. या निर्णायक सामन्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी संघातील खेळाडूंच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे.
मँचेस्टर कसोटीपूर्वी भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे त्रस्त होते. नीतीश कुमार रेड्डी तर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला होता. तसेच अर्शदीप सिंग आणि आकाशदीप हे देखील दुखापतीमुळे चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हते.
आता शेवटच्या सामन्यापूर्वी काही मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. यामध्ये विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे अर्शदीप सिंग (Arshdeep singh) आणि आकाशदीप (Aakash Deep) आता पूर्णपणे फिट झाले आहेत.
गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलं आहे की, संघातील सर्व गोलंदाज आता फिट आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोज यांच्या जागी आता अर्शदीप सिंग आणि आकाशदीप यांना संधी दिली जाऊ शकते.
अर्शदीप सिंगचे चौथ्या कसोटीत पदार्पण होणार होते, पण दुखापतीमुळे ते शक्य झालं नाही. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दोघेही अखेरच्या कसोटीत सर्वोत्तम संघ घेऊनच मैदानात उतरतील, हे निश्चित आहे.
Comments are closed.