मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘गुड न्यूज’ , गामिनीने दिला तीन शावकांना जन्म

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मधला प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात गामिनी नावाच्या मादी चित्त्याने तीन गोंडस शावकांना जन्म दिला आहे. गामिनीला आफ्रिकेतून हिंदुस्थानात आणले होते. या नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे कुनो राष्ट्रीय उद्यानात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी नवजात पिल्लांचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गामिनीने दुसऱ्यांना पिल्लांना जन्म दिला आहे. तिच्या या यशस्वी प्रसूतीबद्दल यादव यांनी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पशूवैद्यकीय पथकाचे आभार मानले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना तीन वर्ष पूर्ण होत असताना ही गुड न्यूज मिळाली. या तीन शावकांच्या येण्यामुळे हिंदुस्थानात जन्मलेल्या शावकांची संख्या 27 वर तर कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची एकूण संख्या 38 झाली आहे.

Comments are closed.