Ganesh Festival 2025 – मुंबईकर गणेशभक्तांसाठी MMRDA चा मोठा निर्णय, गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत धावणार मेट्रो

गणेशोत्सव काळात मुंबईकर गणेशभक्तांना मेट्रोने दिलासा देणारी बातमी दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान म्हणजेच 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात मेट्रो लाईन 2A (अंधेरी पश्चिम-दहिसर) आणि मेट्रो लाईन 7 (गुंदवली-दहिसर) या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत मेट्रो चालवण्यात येणार आहेत. गणोशोत्सव काळात भाविकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीने हा निर्णय घेतला असून या काळात मेट्रो रात्री 11 ऐवजी 12 वाजेपर्यंत धावणार आहे.
असे असेल वेळापत्रक
सोमवार ते शुक्रवार दरम्यान मेट्रोच्या 12 फेऱ्यांची वाढ करत एकूण 317 फेऱ्या
गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटे 50 सेकंदानी गाडी
इतर वेळी दर 9 मिनिटे 30 सेकंदांनी गाडी
शनिवारी 12 फेऱ्यांची वाढ करत एकूण 256 फेऱ्या
गर्दीच्या वेळी दर 8 मिनिटांनी गाडी
इतर वेळी दर 10 मिनिटे 25 सेकंदाने गाडी
रविवारी 12 फेऱ्यांची वाढ करत एकूण 229 फेऱ्या
दर 10 मिनिटांनी गाडी
आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्या वाढवणार
Comments are closed.