गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज, पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी

गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपल्याने सांगलीकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती बाप्पांचे आगमन बुधवारी (दि. 27) होणार असल्याने सांगलीनगरी सज्ज झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली आहे. गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी होती.
सांगली शहरात गेल्या आठवडय़ात पूर आला होता. त्यामुळे गणशोत्सवाच्या तयारीला ब्रेक लागला होता. मात्र, पुराचे विघ्न दूर झाले आणि गणपती बाप्पाच्या तयारीला वेग आला. गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपती आगमनाच्या तयारीला वेग येत आहे. बाजारपेठेत विविध आकारांच्या आणि प्रकारच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. अनेकांनी मूर्ती बुकिंग करण्यावर भर दिला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पुष्पराज चौक ते मार्केटयार्ड या मुख्य रस्त्याला असलेल्या दक्षिणेकडील सर्व्हिस रोडवर स्टॉल उभे केले गेले आहेत. येथे मोठय़ा गणेशमूर्तींची विक्री केली जात आहे.
मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन…
n सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचे आगमन जल्लोषात होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी, बँजो, झांजपथक, ढोलताशा पथकांना सुपाऱया दिल्या आहेत. पहिल्या दिवशी व विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक गणेश मंडळांनी मोठय़ा प्रमाणात बुकिंग केले आहे.
Comments are closed.